Thursday, 22 September 2016

हे जग काय सारे…??
…आसमंत कवेत असेल … 
हा चंद्र हि उद्या माझ्या मुठीत असेल… 

Monday, 12 September 2016

काहूर माजते,हुरहूरही उठते उरी ,
मनाच्या कातरवेळी !
रात्रीच्या डोहात जीव घेतो उडी,
मनाच्या  कातरवेळी !
नको वाटते ती बोचऱ्या वाऱ्याची  मिठी,
मनाच्या कातरवेळी !
असे सगळे हवेसे वाटते नकोसे,
मनाच्या कातरवेळी !
वाटते सुखाची अन आनंदाची
होते माझ्याशी गुपचिळी,
मनाच्या कातरवेळी…….!!

निकिता जाने .....